Pantapradhan kisan yojna udate |पंतप्रधान किसान योजनेचे 2000 रुपये खात्यात पोहोचले नाहीत? आता काय पर्याय आहेत ते जाणून घ्या

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता जारी करण्यात आला आहे.  अनेक शेतकरी पात्र होऊनही 2000 रुपयांपासून वंचित आहेत.  13वा हप्ता मिळविण्यासाठी या शेतकर्‍यांकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत ते जाणुन घ्या.


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता जारी करण्यात आला आहे. 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर 16 हजार कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले. तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र असाल, तरीही तुमच्या खात्यावर 2000 रुपये पोहोचले नाहीत, तर ही रक्कम मिळवण्यासाठी तुमच्याकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे आपण पाहू

 जर 13वा हप्ता आला नाही तर हे पर्याय आहेत - 

 जर तुम्ही पीएम किसान योजनेसंदर्भात ई-केवायसी, आधार सीडिंग, जमीन सीडिंग केले नसेल तर तुमची रक्कम अडकली जाईल. सर्वप्रथम या योजनेच्या वेबसाइटवर जा आणि ही सर्व प्रक्रिया पूर्ण करा. या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, राज्य सरकार तुमचे नाव साफ करेल आणि पुढील हप्त्यासह सर्व पैसे खात्यात हस्तांतरित केले जातील.

Comments